Site icon SAMRIDDH BHARAT NEWS

बिबट्याला पकडणाऱ्या मोहित आहिरे याचा शौर्य पुरस्काराने गौरव करण्यात आला.

प्रतिनिधी -अनिकेत मशिदकर,मालेगाव | नामपूर रोडवरील साई सेलीब्रेशन लॉन्समधील कार्यालयात शिरलेल्या बिबट्यास धाडस व प्रसंगावधान राखीत जेरबंद करण्यात महत्वाची भुमिका बजावविणाऱ्या मोहित अहिरे या बालकाचा कृषि उत्पन्न बाजारसमितीतर्फे शौर्य पुरस्कार देवून गौरव केला गेला.

      मालेगाव-नामपूर रोडवरील साई सेलीब्रेशन लॉन्सच्या कार्यालयात सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास बिबट्याने प्रवेश केला होता. यावेळी कार्यालयात बसलेल्या मोहित अहिरे या दहावर्षीय बालकाने न घाबरता कार्यालयाबाहेर जावून दरवाजा लावल्याने वनविभाच्या पथकास बिबट्यास जेरबंद करता येणे शक्य झाले होते. मोहितने दाखविलेल्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. आज बाजार समिती कार्यालयात आयोजित कार्यक्रमात मोहित यास ज्येष्ठ संचालक रविंद्र मोरे यांच्या हस्ते शौर्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

          या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसभापती अॅड. विनोद चव्हाण होते. यावेळी मोरे यांनी मोहित यास ट्रॉफी, प्रशस्ती पत्र, शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी मार्गदर्शन करतांना उपसभापती चव्हाण यांनी मोहित याने दाखविलेल्या धाडसाचे कौतुक करत त्याने प्रसंगावधान राखीत दरवाजा बंद केल्यामुळेच मोठी अप्रिय घटना टळल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रवींद्र सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमास संचालक नंदलाल शिरोळे, डॉ. उज्जैन इंगळे, विनोद बोरसे, संदीप पवार, रवींद्र निकम, राजेंद्र पवार, बंडूभाऊ पगार, अनिल देवरे, संजय निकम, सचिव कम लेश पाटील, सतीश ढगे आदींसह शेतकरी, व्यापारी उपस्थित होते.

Exit mobile version