Site icon SAMRIDDH BHARAT NEWS

राष्ट्रीय कवी संजय मुकुंद निकम यांची कविता

गाडगे बाबा *

 

गाडगे बाबा

डेबुजी त्यांचे नाव

झाडीती गांव

 

गावाची घाण

मनाची घाण काढी

दीनांना वाढी

 

हाती गाडगे

वाकळ खांद्यावरी

मागे भाकरी

 

टाकूनी मोळी

दात्याच्या अहो दारी

कीर्तन करी

 

मुखी गोपाला

स्वच्छतेचे पुजारी

जन सुधारी

 

संत महान

कर्मच म्हणे राम

गाळती घाम

 

ढोंगी लबाड

अंधश्रध्दा गाडली

शिक्षा वाढली

 

शिकवी कसे

जनता जनार्दन

निर्मळ मन

 

गाडगे बाबा

आधुनिक हे संत

पवित्र ग्रंथ

 

– संजय मुकूंदराव निकम

गायत्रीनगर, मालेगांव कॅम्प, मालेगांव जि. नाशिक

मोबा. 8657488426

 

Exit mobile version