ताज़ा ख़बरेंमहाराष्ट्र

महाराष्ट्रः राजकारण, काका पुतण्या संघर्ष

बारामतीत पुन्हा काका-पुतण्या संघर्ष, अजित पवारांविरोधात शरद पवारांची चाल? कोण आहेत युगेंद्र पवार?

लातूर प्रतिनिधीःअजित पवारांना आता घरातूनच विरोध होऊ लागलाय. कारण अजित पवारांचा सख्खा पुतण्याच त्यांच्याविरोधात उभा ठाकलाय. अजित पवारांचे (Ajit Pawar) धाकटे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांचा मुलगा युगेंद्र पवार (Yugendra Pawar) बारामतीत सक्रीय झालाय. शरद पवार (Sharad Pawar) म्हणतील तीच आपली भूमिका म्हणत युगेंद्र पवारांनी शरद पवारांना साथ देण्याचा निर्णय घेतलाय. शरद पवारांनी सांगितल्यास बारामतीतही राजकीय दौरे करण्याचा इरादा युगेंद्र यांनी बोलून दाखवलाय. अजित पवारांच्या सख्ख्या पुतण्यानेच काकांविरोधात रणशिंग फुंकल्याचं बोललं जातंय.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूटीनंतर अजित पवारांनी बारामतीत भावनिकतेच्या राजकारणावरुन थेट शरद पवारांवरच हल्लाबोल केला. तर सुप्रिया सुळेंवरही (Supriya Sule) पहिल्यांदाच जाहीर निशाणा साधला. पवार कुटुंबातून कोणीही आपल्यासाठी प्रचार करणार नाही. बाकीच्या परिवाराने मला एकट पाडलं तरी बारामतीकरांनी एकटं पाडू नये असं आवाहनही अजित पवारांनी केलं होतं.

Show More
Back to top button
error: Content is protected !!