Site icon SAMRIDDH BHARAT NEWS

वडगाव मावळ येथे होणार ८ पुस्तकांचा प्रकाशन सोहळा

प्रतिनिधी -अनिकेत मशिदकर: 10फेब्रुवारी 2024 रोजी फेसबुक समूह चारोळी मंच तर्फे आयोजित प्रकाशन सोहळा आणि ओळख कवीची.. हे काव्यसंमेलन..डॉक्टर रवी आचार्य ( मधुमेह तज्ज्ञ) यांच्या आचार्य फाऊंडेशन वडगाव मावळ येथे करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष कवितेतील बाप माणूस जेष्ठ कवी श्री चंद्रकांत दादा वानखेडे हे आहेत. आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक आणि कवी रवींद्र यशवंतराव. आणि कवी सचिन शिंदे हे लाभले आहे.तब्बल आठ पुस्तकांचं येथे प्रकाशन करण्यात येणार आहे सौ. सुनीता कावसनकर प्रकाशक आहेत. काव्यरंग, काव्यगंध, काव्यांकुर, काव्यदिप, काव्यराज, काव्यउमंग, काव्यतरंग आणि खिल्लार यां आठ पुस्तकांचं प्रकाशन होणार आहे. यातले चार प्रातिनिधिक आणि चार वैयक्तिक पुस्तके असणार आहेत.

तसेच चारोळी मंच चे संस्थापक श्री. तुकाराम कांबळे चारोळी मंच चे कार्यकारी अध्यक्ष श्री विनायक चिखलीकर आणी चारोळी मंच आयोजक सौ.स्नेहल चौधरी हे मंचावर उपस्थित असणार आहेत.

चारोळी मंच चा हेतू इतकाच की प्रत्येक कविला स्वतः ची ओळख निर्माण करता यावी. आणि पुस्तकाचे स्वप्न जे कवी बघत असतात ते पूर्ण करायला चारोळी मंच कायम प्रयत्नशील राहील.

Exit mobile version