Uncategorizedअन्य खबरेताज़ा ख़बरें
Trending

विवेकानंद सोसायटीला निवडणूक आयुक्त मा.श्री.अनिल कवडे यांची सदिच्छा भेट

विवेकानंद सोसायटीला निवडणूक आयुक्त मा. श्री.अनिल कवडे यांची सदिच्छा भेट

विवेकानंद सोसायटीला निवडणूक आयुक्त
मा.श्री.अनिल कवडे यांची सदिच्छा भेट

नागपूर: महाराष्ट्र राज्याच्या सहकार खात्याचे मुख्य निवडणूक आयुक्त मा.श्री.अनिल कवडे यांनी विवेकानंद नागरी सहकारी प्रत्यय संस्थेला सदिच्छा भेट दिली. यावेळी सहकार खात्याचे नागपूर विभागाचे विभागीय सहनिबंधक मा.श्री. प्रवीण वानखेडे, नागपूर जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक मा.श्री.गौतम वालदे प्रामुख्याने उपस्थित होते. विदर्भातील सहकारी संस्थांच्या निवडणुकीसंदर्भातील आढावा बैठकीच्या निमित्ताने राज्याच्या निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त नागपुरात आले होते. यामध्ये सहकार खात्याच्या विभागीय सहनिबंधकांसोबतच सर्व जिल्ह्यांचे जिल्हा उपनिबंधक सहभागी झाले होते.

विवेकानंद सोसायटीचे अध्यक्ष श्री विवेक जुगादे यांनी निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त मा.श्री. अनिल कवडे यांचा संस्थेच्या वतीने हृदय सत्कार केला. याप्रसंगी बोलताना निवडणूक आयुक्त मा.श्री.अनिल कवडे यांनी विवेकानंद सोसायटीच्या प्रगती विषयी समाधान व्यक्त करत सर्व संचालक मंडळाचे कौतुक केले. विवेकानंद सोसायटीच्या व्यवसायात प्रचंड वाढ होत असून संस्थेला यंदा विक्रमी नफा झाला आहे. तसेच संस्थेने सर्व अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात केले असून ग्राहकांना दिल्या जात असलेल्या सेवेबद्दल मा.श्री. अनिल कवडे यांनी संस्थेची भरभरून प्रशंसा केली. केवळ विश्वासाच्या बळावर संस्थेने केलेली प्रगती अतिशय कौतुकास्पद आहे. सहकाराचे मूळ तत्व जोपासत विवेकानंद सोसायटीची घोडदौड अशीच सुरू राहावी यासाठी त्यांनी संस्थेला शुभेच्छा दिल्यात.

प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष श्री विवेक जुगादे यांनी संस्थेच्या प्रगतीची माहिती उपस्थितांना दिली. संस्थेचा एकूण व्यवसाय 145 कोटींच्या वर पोहोचला असून संस्थेला यंदा 3 कोटींच्या वर ढोबळ नफा झाला आहे. सर्व सामान्य ग्राहकांच्या सोयीसाठी संस्थेने अत्यंत कमी व्याजदरात अनेक नवनवीन कर्ज योजना आणल्या आहेत. सोबतच ठेवीदारांना त्यांच्या ठेवींवर संस्था आकर्षक व्याज देत आहे. ग्राहक व सभासद यांच्या विश्वासामुळेच संस्थेने ही उत्तुंग झेप घेतली असल्याचे मत विवेक जुगादे यांनी याप्रसंगी व्यक्त केले. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष श्री महेश अंधारे, संचालक श्री विवेक बापट, श्री मधु गौर प्रामुख्याने उपस्थित होते.

Show More
Back to top button
error: Content is protected !!